कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा वाढला ! आता हे कागदपत्र आवश्‍यक ! असा करा अर्ज ! काय काळजी घ्‍यावी ?

सौर कृषि पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्‍य होणार आहे. त्‍यामुळे बहुसंख्‍य शेतकरी बांधव या योजनेसाठी अर्ज करीत आहेत. मागील काळात कोटा संपल्‍याचा मॅसेज येत होता, मात्र आता तसा मॅसेज येत नाही, याचाच अर्थ कोटा वाढवण्‍यात आला आहे. अर्थात यातूनही लॉटरी काढली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरतांना आपला गट नंबर व्‍यवस्थित नमूद करावा, एकदा वापरलेला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर दुसऱ्यासाठी वापरता येत नाही. तसेच आधारक्रमांक आणि मोबाईल नंबर अचूक टाकणे आवश्‍यक आहे. आपणास जमिन किती आहे त्‍यानुसार 3HP, 5HP व 7Hp पर्याय निवडावे.

अनेक जण असे आहेत जे राहतात एका गाव शिवारात आणि त्‍यांची जमिन आहे दुसऱ्या शिवारात. तर अशा परिस्थितीत ऑनलाईन अर्ज करतांना तसे ऑप्‍शन निवडावे, जेथे जमिनीची माहिती विचारली आहे तेथे जमिनीचा गट नंबर, गांव व इतर माहिती भरावी, तसेच रहीवाशी पत्‍ता विचारल्‍यास आपण जेथे राहता तो पत्‍ता टाकावा. हे दोन पर्याय वेगवेगळे दिलेले आहेत.

फॉर्म भरतांना काही वेळेस वेबसाईट व्‍यवस्थित कार्य करीत नाही, अशा परिस्थितीत पुन्‍हा पुन्‍हा प्रयत्‍न करत रहावेत, शिवाय आपण CSC किंवा महा ई सेवा केंद्रातून फॉर्म भरत असल्‍यास त्‍यांनाही Online सगळी माहिती चेक करून भरण्‍याबाबत विनंती करावी.

अर्ज करण्‍यासाठी कागदपत्र :-

ऑनलाईन अर्ज करण्‍यासाठी महत्‍वाचे कागदपत्र म्‍हणजे आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, 7/12 आणि मोबाईल नंबर आवश्‍यक आहे. तसेच ज्‍यांची विहीर सामाईक आहे त्‍यांना बॉण्‍ड करणे आवश्‍यक आहे. शिवाय जे कॅटेगरी मध्‍ये येतात त्‍यांना जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्‍यासाठी फक्‍त खालील लिंकचाच वापर करावा.

कुसुम सोलर योजनेची लिंक

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!