Kunbi Maratha Aarakshan : महाराष्ट्र सरकारने मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्या संदर्भात थेट GR काढला असून या निर्णयामुळे मराठवाड्यातील असंख्य मराठा समाज बांधवाना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे.
Maratha Kunbi Reservation
महाराष्ट्र सरकारने दि.7 रोजी जी.आर. काढला असून या निर्णयामुळे कुणबी प्रमाणत्र मिळण्याच्या दृष्टीने सरकारचे हे महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल. मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या संबंधित कागदपत्रा आधारे त्यांना प्रमाणपत्र मिळू शकेल.
Kunbi Maratha Aarakshan
जे व्यक्ती प्रमाणपत्राची मागणी करतील त्यांनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करून त्यांना मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
Maharashtra Maratha protest
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे इतर मागण्यासांठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केलेले आहे. शासनाने जीआर काढावा अशीही त्यांनी मागणी केली होती, शासनाने सदरील मागणी मान्य करून जीआर काढला आहे.
Maratha Kunbi Certificate
शासनाने मराठवाड़्यातील मराठा समाजास मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रिये मध्ये आवश्यक त्या पुराव्यांची तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा.न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समित स्थापन करण्या मान्यता दिली आहे. जीआरची लिंक व इतर माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…