Your Alt Text

राज्‍यात 2109 कृषि सेवक पदाची भरती ! ही आहे शेवटची तारीख ! | Krushi Sevak Bharti 2023

या आर्टीकल मध्‍ये आपणास Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Exam Last Date, Qualification, Salary, Application form Apply online, Syllabus, Hall Ticket, Age Limit इत्‍यादी माहिती मराठी भाषेत देण्‍याचा प्रयत्‍न करणार आहोत.

Krushi Sevak Job

आपणास माहितच असेल की, कृषि सेवक हे पद ग्रामीण भागात विशेष करून शेतकऱ्यांसाठी अत्‍यंत महत्‍वाचे पद आहे. कृषि सेवक शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती देत असतो, शेतकऱ्यांना विविध माहितीसह प्रोत्‍साहन देणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्‍याचा प्रयत्‍न करणे, शेतकरी व कृषि विभाग पर्यायाने सरकार मध्‍ये समन्‍वय साधण्‍याचा प्रयत्‍न करणे इत्‍यादी कामे कृषि सेवकाला करावी लागतात.

Krushi Sevak Recruitment

सध्‍या राज्‍यातील अनेक जिल्‍ह्यात कृषि सेवक पदाची भरती जाहीर करण्‍यात आली आहे, 14 सप्‍टेंबर पासून Krushi Sevak Online Application करण्‍यास सुरूवात झालेली आहे. त्‍यामुळे इच्‍छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्‍यक आहे.

Krushi Sevak Qualification & Age

महाराष्‍ट्र कृषि विभागाकडून कृषि सेवक पदाची भरती जाहीर कण्‍यात आली असून या भरतीमध्‍ये उमेदवाराचे शिक्षण शासनमान्‍य संस्‍था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्‍लोमा किंवा पदवी किंवा समतुल्‍य शिक्षण असणे आवश्‍यक आहे. याबाबतची अधिक माहिती शासनाच्‍या वेबसाईटवर पहायला मिळेल. शिवाय उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्ष असावे, मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट असेल.

Krushi Sevak Online Application Fees

कृषि सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्‍यासाठी फी ठेवण्‍यात आली असून खुल्‍या प्रवर्गासाठी 1000 रूपये फी राहणार असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रूपये फी ठेवण्‍यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्‍क भरण्‍याची सुविधा देण्‍यात आली असून उमेदवार Debit Card ( Rupay Card / Visa Card / Master Card etc.) Credit Card, Internet Banking, Mobile Wallet इत्‍यादी माध्‍यमातून पैसे भरू शकतात. पैसे भरतांना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत Back बटन दाबू नये किंवा Refresh करू नये.

ऑनलाईन पैसे भरल्‍यानंतर एक E-Receipt म्‍हणजेच पावती तयार होईल ज्‍यावर भरलेल्‍या पैशांची माहिती असेल, उमेदवारांनी सदरील पावतीची प्रिंट काढून घ्‍यावी.

Krushi Sevak Online Apply

कृषि सेवक पदासाठी इच्‍छुक असलेल्‍या उमेदवारांना कृषि विभाग किंवा संबंधित जिल्‍हा प्राधिकरणाने सुचित केलेल्‍या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्‍यासाठी उमेदवार https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट देवू शकतात.

ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांनी सत्‍य माहिती अर्जामध्‍ये भरणे आवश्‍यक आहे, कारण ऑनलाईन अर्ज भरतांना काही चुका किंवा त्रुटी राहील्‍यास भरतीच्‍या कोणत्‍याही टप्‍प्‍यावर अर्ज नाकारला जावू शकतो, कदाचित उमेदवाराला तक्रारही करणे शक्‍य होणार नाही. शासनाने प्रसिध्‍द केलेली जाहीर व्‍यवस्थित वाचून त्‍यानुसार फॉर्म भरणे आवश्‍यक आहे.

Krushi Sevak Exam Syllabus

कृषि सेवक भरती परीक्षेसाठी विभागाकडून अधिकृतपणे सिलॅबस देण्‍यात आला असून त्‍यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून सविस्‍तर सिलाबस बद्दल माहिती घेता येईल.

Krushi Sevak Exam Hall Ticket

कृषि सेवक पदासाठी उमेदवारांनी अर्ज केल्‍यानंतर संबंधित वेबसाईटच्‍या माध्‍यमातूनच उमेदवारांना हॉल तिकीट मिळणार आहेत, हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र इतर कोणत्‍याही माध्‍यमातून पाठवले जाणार नाहीत, त्‍यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्‍यानंतर संबंधित संकेतस्‍थळावरून हॉल तिकीट स्‍वत: डाउनलोड करावा.

Krushi Sevak Bharti 2023 परीक्षेसाठी नियम

Krushi Sevak Bharti 2023 साठी संबंधित विभागाकडून काही नियम करण्‍यात आले असून त्‍याचे पालन करणे आवश्‍यक आहे. ज्‍यामध्‍ये परीक्षा केंद्रात किंवा परिसरात मोबाईल, गणकयंत्र (Calculator), आयपॅड वा तत्‍सम इलेक्‍ट्रॉनिक यंत्रे किंवा संपर्काची साधने वापरण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात आली आहे.

कृषि सेवक पदासाठी अर्ज करण्‍यापूर्वी विभागाकडून प्रकाशित करण्‍यात आलेली जाहीरात किंवा माहिती योग्‍य माहिती वाचूनच अर्ज करावा, जेणेकरून अडचण येणार नाही. कृषि सेवक पदासाठी अर्ज भरण्‍याची शेवटची तारीख आणि जाहीरात पाहण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

कृषि सेवक पदासाठी अर्ज करण्‍याची शेवटची तारीख आणि जाहीरात पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!