Krishi Sevak Salary : महाराष्ट्र शासनाने कृषि सहाय्यकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे कृषि सहाय्यकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता पर्यंत कृषि सहाय्यकांना अत्यंत कमी मानधनावर काम करावे लागत होते, गेल्या अनेक वर्षांपासून कृषि सहाय्यकांचे पगार वाढवावे म्हणून मागणी करण्यात येत होती.
कृषि सहाय्यकांना आता पर्यंत 6000 रूपये मानधन मिळत होते, मात्र एवढ्या कमी पगारा मध्ये कृषि सहाय्यक यांना कर्तव्य बजवावे लागत होते, सदरील मानधन एखाद्या मजुरापेक्षाही कमी होते, सदरील पगारामध्ये कृषि सेवकांचा उदरनिर्वाह होणे शक्य नव्हते, त्यामुळे सदरील कृषि सहायक अडचणीत सापडले होते.
Krishi Sevak Salary
याबाबत संबंधित संघटना व कृषि सेवकांकडून पगार (मानधन) वाढवण्याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करण्यात येत होती, अद्यापर्यंत यावर विशेष काही निर्णय झाला नव्हता, मात्र कृषि सेवकांचे काम अथवा कर्तव्य लक्षात घेवून तसेच त्यांना मिळत असलेले तुटपुंजे मानधन लक्षात घेवून सरकारने त्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.