Reliance ने आता बहुचर्चित Jiobook Laptop लॉन्च केला आहे. रिलायन्स म्हटले की नेहमी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता Jio ने जो लॅपटॉप लॉन्च केला आहे त्याची चर्चा मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे, कारण हा लॅपटॉप लोकांना मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत घेता येणार आहे.
Reliance Jiobook Laptop
याआधी जेव्हा इंटरनेट डाटा खूप महाग होता, तेव्हा Reliance Jio ने मार्केट मध्ये एन्ट्री करत मार्केट मध्ये धमाल केली होती, म्हणजेच Jio नव्हते त्यावेळेस आज जेवढा डाटा आपण एका दिवसात वापरत आहोत तेवढा इंटरनेटचा डाटा इतर कंपन्यांकडून एका महिन्यासाठी मिळत होता, उदाहरणार्थ Jio च्या आधी इतर कंपन्या एका महिन्यासाठी फक्त 2 GB डाटा देत होत्या.
Jio 4G लॉन्च झाल्यानंतर इतर कंपन्यांनीही डाटा स्वस्त केला होता. आता Jio कंपनीने लॅपटॉप कडे आपला मोर्चा वळवला आहे, कारण आजच्या घडीला लॅपटॉप घ्यायचे म्हटले की, सामान्य लॅपटॉप सुध्दा 30 हजाराच्या पुढे असतो मात्र Jio ने सध्या लॉन्च केलेला लॅपटॉप हा मोबाईलच्या किंमतीपेक्षाही कमी किंमतीत आहे.
Jio Book Laptop Specification
सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा Jio Book Laptop चे वजन फक्त 990 ग्रॅम इतके आहे. या लॅपटॉपमध्ये 4GB रॅम असून 64GB स्टोरेज आहे. मायक्रो एसडी म्हणजेच मेमरी कार्डच्या माध्यमातून ही स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येवू शकेल. लॅपटॉप मध्ये Octa Core Processor असून Jio ऑपरेटींग सिस्टीम आहे.
लॅपटॉप मध्ये वायफाय आणि Bluetooth 5.0 देण्यात आले आहे. शिवाय लॅपटॉपला अँटी ग्लेअर HD Display देण्यात आला आहे. HDMI पोर्ट कनेक्टीवीटी आहे. सदरील लॅपटॉपची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून केली जात होती, आता हा लॅपटॉप लॉन्च झाल्यानंतर याची मोठी विक्री होणार आहे. लॅपटॉपची किंमत तसेच बुकिंग कोठे करायची व इतर माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…