Jawan Movie Review and Collection : शाहरूख खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. अर्थातच चित्रपटाला देशभरासह जगात मोठ्या प्रमाणावर पाहीले जात आहे. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
चित्रपटामध्ये भारतीय सेना, देशातील शेतकरी, आरोग्य व्यवस्था, गलीच्छ राजकारण यासह मुर्दाड झालेल्या जुलमी व्यवस्थेवर प्रहार करणारा हा चित्रपट म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अनेक शेतकरी हा चित्रपट पाहून आनंदी दिसून येत आहेत कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मोठ्या पडद्यावर दिग्गज अभिनेत्याने आमचा आवाज उठवला आहे.
Jawan Movie Review and Collection
जवान चित्रपट हा फक्त एका विषयावर आधारीत नसून समाजातील विविध समस्येंवर प्रहार करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये शाहरूख खान सह अभिनेत्री नयनतारा, विजय सेथुपती, सुनिल ग्रोव्हर, दिपीका पदुकोन, सान्या मल्होत्रा, संजय दत्त इत्यादींच्या भुमिका आहेत.
आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो ते त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थित पाडतात का ? व्यवस्थेमधला भ्रष्टाचार, हलगर्जीपणा, जनसामान्यांची होणारी पिळवणूक अशा विविध मुद्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटातील विक्रम राठोड (शाहरूख खान) या देशभक्त जवानाची व्यवस्थेशी लढण्याची कहानी या चित्रपटाचा केंद्रबिंदू म्हणता येईल. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भुमिका साकारतांना शाहरूखने प्रेक्षकांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Jawan Movie Box office Collection
शाहरूखचा सदरील जवान चित्रपट पाहून लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पहायला मिळत आहे, चित्रपट पाहून येणारा प्रत्येक व्यक्ती चित्रपटाबद्दल सकारात्मक आणि आनंदी दिसून येत आहे, शिवाय पैसा वसूल झाल्याचे सांगत आहे. अर्थातच आपणास चित्रपटाची आवड असल्यास सिनेमागृहात चित्रपट पाहण्यास हरकत नाही. शाहरूखच्या जवानने आतापर्यंत किती कोटी कमावले या माहितीसाठी…. येथे क्लिक करा….