Your Alt Text

सरकार देणार महिलांना मोफत मोबाईल ! इंटरनेटही मोफत मिळणार ! 1 कोटी 35 लाख महिलांना मिळणार लाभ | Indira Gandhi Smartphone Yojana

सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला असून Indira Gandhi Smartphone Yojana अंतर्गत महिलांना मोफत मोबाईल दिले जाणार आहे. एवढंच नव्‍हे तर महिलांना मोबाईल सोबत 3 वर्षांसाठी इंटरनेटरही मोफत दिले जाणार आहे. योजनेची सुरूवात झाली असून नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली आहे. काय आहे ही योजना आणि कसा मिळेल लाभ याबाबत जाणून घेवू या.

एकूण 1 कोटी 35 लाख महिलांना स्‍मार्टफोन (स्‍क्रीनटच) मोबाईल दिले जाणार आहे, या सोबतच महिलांना इंटरनेटही मोफत दिले जाणार आहे, महिला आपल्‍या आवडीनुसार मोबाईल घेवू शकतील तसेच त्‍यांना कोणत्‍या कंपनीचे सिमकार्ड घ्‍यायचे आहे हे सुध्‍दा महिला स्‍वत: ठरवू शकतील. म्‍हणजेच सरकारने निवड केलेल्‍या मोबाईल मॉडेल पैकी मोबाईल आणि सिमकार्ड घेण्‍याचे स्‍वातंत्र्य देण्‍यात येणार आहे.

Indira Gandhi Smartphone Yojana

महिलांना मोबाईल देण्‍यामागचा हेतू सरकारने सांगितला आहे की, मोबाईलच्‍या माध्‍यमातून सरकारी योजना त्‍यांच्‍यापर्यंत सहज पोहोचू शकतील, विविध योजनांचा लाभ ते घर बसल्‍या घेवू शकतील, ऑनलाईन अप्‍लाय करू शकतील, सोबतच देश आणि जगातील माहिती त्‍यांना मोबाईलवर मिळत राहील.

मोबाईलमुळे महिलांमध्‍ये जागरूकता वाढेल आणि ते समृध्‍दीच्‍या दिशेने वाटचाल करतील. राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या प्रगतीमध्‍ये सहभागी होवू शकतील. सदरील मोबाईल कोणाला आणि कसा मिळेल यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

महिलांना फ्री मोबाईल कसा मिळेल ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!