महाराष्ट्र सरकारकडून नोकरीची सुवर्णसंधी (Government Jobs Maharashtra) उपलब्ध होणार आहे. कारण महाराष्ट्र शासन नवीन 11 हजार पदांची भरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा तरूण तरूणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारी नोकरी मिळावी म्हणून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची इच्छा असते, असंख्य विद्यार्थी वर्षानुवर्षे नोकरीसाठी अभ्यास करत असतात. सदरील विद्यार्थी नोकर भरती होईल म्हणून प्रतिक्षा करत असतात. नोकर भरती सुरू झाल्यानंतर अर्ज दाखल करून प्रक्रिया पूर्ण करून अनेकांना नोकरी मिळत असते.
परंतू मागील काळात कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे नोकरी भरती झाली नाही. एकतर कोरोनामुळे असंख्य कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. एकतर हाताला काम नाही, त्यात नोकर भरतीही नाही, त्यामुळे अनेक होतकरू व सुशिक्षित तरूण तरूणींपुढे रोजगाराची समस्या निर्माण झाली होती.
Government Jobs Maharashtra
आता मात्र सरकारने नोकर भरतीच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून एक एक करून विविध विभागातील भरती जाहीर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच गृह विभाग, वन विभग, महसूल विभागातील भरतीची घोषणा करण्यात आली होती. ज्याच्या परीक्षाही संपन्न होत आहेत. आता सरकारने नवीन 11 हजार पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. कोणत्या विभागात नोकर भरती जाहीर झाली आहे, एकूण किती पदे आहेत या माहितीसाठी…. येथे क्लिक करा….