पहिल्या टप्प्यात 40 लाख महिलांना मोबाईलचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास सर्वच क्षेत्रातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उदाहरणार्थ 9 वी ते 12 वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी, महाविद्यालयातील विद्यार्थीनी, मनरेगा मध्ये मजूरी करणाऱ्या महिला, तसेच कुटुंबातील प्रमुख महिलांना हा स्मार्टफोन देण्यात येणार आहे.
मोबाईलचे वाटप करण्यापूर्वी महिलांची नोंदणी करण्यात येत आहे, त्यासाठी जागोजागी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. फ्री मोबाईलचा लाभ घेण्यासाठी महिलांना फक्त आधार कार्ड, जनाधार कार्ड, जर पॅनकार्ड असेल तर पॅनकार्ड आणि नोंदणीसाठी एक मोबाईल नंबर असावा.
सदरील नोंदणीसाठी आयोजित शिबीरात महिलांची ekyc करण्यात येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर सिमकार्ड आणि मोबाईल खरेदीसाठी जवळपास 6800 रूपये ट्रान्सफर केले जाणार आहे. सदरील योजना ही राजस्थान मध्ये सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात राजस्थान मधील 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.