केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जी कार लॉन्च केली आहे त्या कारचे नाव Toyota Flex Fuel Car असून सदरील कार ही ऊसाच्या रसापासून तयार झालेल्या इथेनॉलवर चालणार आहे. इथेनॉल हे इंधन फक्त ऊसाच्या रसापासूनच नव्हे तर मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला इत्यादी पदार्थापासून सुध्दा तयार होते.
सदरील फ्लेक्स फ्यूअल कार 100 टक्के इथेनॉलवर तर चालणारच आहे, परंतू त्यासोबतच ही कार 40 % वीज निर्मिती सुध्दा करते, म्हणजेच इलेक्ट्रिक पर्यायावर सुध्दा ही कार चालू शकते. सदरील कार ही ज्या इथेनॉलवर चालणार आहे ते इथेनॉल पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त असल्यामुळे वाहनावरील खर्चही कमी होणार आहे.
इथेनॉलवर आधारीत सदरील कार लॉन्च झाल्यामुळे येत्या काळात इतरही कंपन्या इथेनॉलवर आधारीत वाहने बनवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इथेनॉलची मागणी वाढणार असल्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना सुध्दा याचा फायदा होणार आहे. सदरील वाहन नुकतंच लॉन्च झाल्यामुळे या कारची अधिकृत किंमत समोर आलेली नाही.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.