Your Alt Text

दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता गुन्‍हे दाखल होणार ! | Establishment of Committee for Milk

राज्‍यात दुधात भेसळीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून आहे. मात्र आता Establishment of Committee for Milk करण्‍यात आली आहे. म्‍हणजेच आता दुध भेसळ करणाऱ्यांविरूध्‍द थेट कार्यवाही केली जाणार आहे. राज्‍यात दुधात होत असलेली भेसळ हा नेहमी चिंतेचा विषय राहीलेला आहे. भेसळयुक्‍त दुधामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावरही परिणाम होत आहे.

राज्‍यातील दूध दर व दूध भेसळ प्रश्‍नाबाबत दूध उत्‍पादक, सहकारी व खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्‍पादक कंपन्‍या व शेतकरी संघटनांच्‍या प्रतिनिधी सोबत पशुसंवधन व दुग्‍धव्‍यवसाय मंत्री यांची बैठक झाली होती. या बैठकीत उपस्थितांनी राज्‍यात दुधामध्‍ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्‍यात येत असल्‍याचा मुद्दा उपस्थित केला होता.

Establishment of Committee for Milk

सदरील भेसळीमुळे एकूण दूध उत्‍पादन व मागणी या मध्‍ये तफावत निर्माण होवून राज्‍यात दुधाचा कृत्रिम फुगवटा तयार केला जातो, त्‍याचा परिणाम हा दूध उत्‍पादक शेतकऱ्यांचा दुधाला रास्‍त दर मिळत नाही, शिवाय दूध भेसळीमुळे जनतेच्‍या आरोग्‍यावर परिणाम होतो. त्‍यानुषंगाने दुधात भेसळीला पायबंद घालण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्‍याचे शासनाच्‍या विचाराधीन होते.

आता याबाबत शासन निर्णय (GR) काढण्‍यात आला असून या निर्णयानुसार दूध भेसळीमुळे जनतेच्‍या आरोग्‍यावर परिणाम होत असून शिवाय शेतकऱ्यांच्‍या दुधाला रास्‍त दर सुध्‍दा मिळत नाही. राज्‍यातील जनतेला स्‍वच्‍छ व गुणवत्‍तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्‍याच्‍या अनुषंगाने दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थात होणारी भेसळ रोखण्‍यासाठी सर्व जिल्‍ह्यात जिल्‍हास्‍तरीय समिती (पथक) स्‍थापन करण्‍यात आले आहे.

या पथक अथवा समितीमध्‍ये अप्‍पर जिल्‍हाधिकारी हे अध्‍यक्ष असतील तर अपर पोलीस अधिक्षक, सहायक आयुक्‍त, अन्‍न व औषध प्रशासन, जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त, उपनियंत्रक वैध मापन शास्‍त्र हे सदस्‍य असतील आणि जिल्‍हा दुग्‍ध‍व्‍यवसाय विकास अधिकारी हे सदस्‍य सचिव असतील.

सदरील पथक अथवा समिती दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थातील भेसळ रोखण्‍यासाठी उपरोक्‍त समिती धडक मोहीम हाती घेणार आहे. तसेच भेसळ करणाऱ्यांवर थेट FIR दाखल करण्‍यात येणार आहे. शिवाय या सहभागी सर्वांवर कार्यवाही करण्‍यात येणार आहे. या कार्यवाहीसाठी जिल्‍हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांचेही महत्‍वाचे सहकार्य राहणार आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

Leave a Comment

error: Content is protected !!