मार्केट मध्ये सध्या काही कंपन्या इलेक्ट्रिक किट सुध्दा बसवून देत आहेत, परंतू स्वत: कंपनीच अशा प्रकारची इलेक्ट्रिक बनवल्यास ती अधिक सक्षम आणि ग्राहकांना परवडण्यासारखी असू शकते असे अनेकांना वाटते. त्यामुळे कंपनीचीच इलेक्ट्रिक बाईक असल्यास लोकांचा कल अधिक असू शकतो.
मिडीया रिपोर्टस नुसार हिरो आपली इलेक्ट्रिक बाईक लवकरच मार्केट मध्ये उतरवू शकते. सदरील बाईक मध्ये विविध मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 120 कि.मी. पासून ते 240 कि.मी. रेंज असू शकते. कंपनीने यापूर्वीच दुसऱ्या मॉडेलची टू व्हीलर लॉन्च केली आहे.
त्यामुळे आता कंपनीकडून स्प्लेंडरचे सुध्दा इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केट मध्ये येण्याची शक्यता आहे. कंपनीकडून अद्याप अशा प्रकारची कोणत्याही मॉडेलची घोषणा किंवा किंमती बाबत अधिकृत माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मिडीया रिपोर्टस मध्ये याबाबत माहिती समोर येत आहे. कंपनीकडून लवकरच अशा प्रकारची बाईक रस्त्यावर धावू लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.