आपण येथे बुलेटचे गांव कोणते याबद्दल जाणून घेणार आहोत. ही यशोगाथा आहे सांगली जिल्ह्यातील बेडग गावाची. साधारण 27 हजार लोकसंख्या असलेले बेडग हे गाव आहे. वीस वर्षांपूर्वी या गावाची ओळख दुष्काळी गाव अशीच होती. परंतू मिरण पूर्व भागात म्हैसाळ सिंचन योजने मार्फत पाण्याची सोय झाली आणि संपूर्ण गाव हिरवेगार झाले.
या ठिकाणी विशेष करून द्राक्षे, ऊस व बागायती शेती फुलवण्यात आल्या. दारात उभ्या असणाऱ्या बैलगाडीने चारचाकी वाहनांची जागा घेतली. या गावात द्राक्षे, ऊस, यासोबतच कुक्कुटपालन सुध्दा केले जाते. एकाने बुलेट आणली की दुसऱ्याने आपल्याकडेही बुलेट हवी म्हणून एक एक करून गावात बुलेट गाड्या झाल्या.
फक्त तरूणांमध्येच नव्हे तर जेष्ठ मंडळीमध्ये सुध्दा बुलेट ची क्रेझ आहे. शिवाय तरूणींमध्ये सुध्दा बुलेट गाडीची क्रेझ आहे. काही कुटुंबात तर एकापेक्षा जास्त बुलेट गाड्या आहेत. गावात एवढ्या बुलेट गाड्या झाल्या की आज या गावाला बुलेट चे गाव म्हणून ओळखले जाते.