ड्रॅगन फ्रुटच्‍या शेतीतून एका एकरात किती लाखांचे उत्‍पन्‍न मिळते ? माहिती खालील प्रमाणे…

ड्रॅगन फ्रुटचे एक वैशिष्‍ट्ये म्‍हणजे या झाडाची एकदा लागवड केल्‍यानंतर जवळपास 20 वर्षे यातून आपणास उत्‍पन्‍न मिळू शकते. ड्रॅगन फ्रुटची लागवड करतांना शक्‍यतो सिमेंटचे पोल उभे केले जातात, आणि त्‍या आधारे ही लागवड केली जाते.

ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्‍यानंतर दिड वर्षानंतर त्‍याची व्‍यवस्थित वाढ होते व दुसऱ्याच वर्षापासून साधारणपणे उत्‍पादन मिळण्‍यास सुरूवात होते, परंतू दुसऱ्या वर्षात उत्‍पादन कमी मिळते, परंतू तिसऱ्या वर्षापासून चांगले उत्‍पादन मिळते.

सदरील झाडांची लागवड केल्‍यानंतर कंपोस्‍ट खत व सेंद्रीय खतांचा वापर केल्‍यास उत्‍पादन अधिक चांगले येते, सदरील ड्रॅगन फ्रुटची लागवड कोणत्‍याही प्रकारच्‍या जमिनीमध्‍ये करता येते, परंतू जमीन पाण्‍याचा निचरा होणारी असणे गरजेचे असते.

देशात अनेक राज्‍यात या फळ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. साधारण एका एकरात 10 ते 15 लाख रूपये उत्‍पन्‍न मिळत असल्‍याचे माध्‍यमांमधून समोर आले आहे. त्‍यामुळे या फळ पिकाची योग्‍य ती माहिती घेवून शेतकरी या पर्यायाचा विचार करू शकतात.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!