दिवस रात्र देशात धावणाऱ्या रेल्वेला विविध प्रकारचे पावर जनरेटर वापरले जाते. डिझेलच्या इंजिनचे माइलेज अनेक गोष्टींवर अवलंबून असते. इंजिन किती पावरचा आहे, त्याची क्षमता किती आहे ? रेल्वे कशा भागातून जात आहे ? किती वेळा रेल्वे थांबत आहे. अशा अनेक गोष्टींवर रेल्वेचे माइलेज असते.
12 डब्याची Local Train असेल आणि त्यास डिझेल इंजिन असेल तर ही ट्रेन 6 लिटर मध्ये 1 कि.मी. धावते. तसेच जर ट्रेन एक्सप्रेस असेल आणि 24 डब्यांची असेल तरीही ही ट्रेन 6 लिटरला 1 कि.मी. धावते. परंतू जर 12 डब्यावाली ट्रेन एक्सप्रेस असेल तर ती 1 किलोमिटरला 4.5 लिटर लागते. पॅसेंजर ट्रेनला बऱ्याच ठिकाणी थांबावे लागते त्यामुळे त्यास एक्सप्रेसच्या तुलतेन थोडे जास्त डिझेल लागते.