महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी एक महत्वपूर्ण वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून राज्यातील नागरिक कोणत्याही विभागाशी संबंधित तक्रार अवघ्या काही मिनिटात आपल्या मोबाईवरून थेट शासनाकडे करू शकतात.
तक्रार करण्यासाठी नागरिकांना grievances.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर तक्रार करत असल्यास तुम्हाला नागरिक नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल, येथे तुमचा मोबाईल नंबर व कॅप्चा भरून सबमिट करावे लागेल.
Login केल्यावर सर्वप्रथम तुमचा जिल्हा, तालुका, गांव/शहर इत्यादी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ज्या संदर्भात तक्रार करायची आहे तो पर्याय निवडता येईल. या ठिकाणी जे काम झाले नाही किंवा अपूर्ण आहे अशी काही तक्रार असेल तर तुम्ही त्या कामाचे फोटो सुध्दा अपलोड करू शकता.
सदरील माहिती भरून तक्रार केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर सुध्दा मिळेल, म्हणजेच तुमच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली हे तुम्हाला कळू शकेल.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.