Complaint to Govt : आता कोणत्याही विभागाची, अधिकाऱ्याची किंवा संबंधित कामाची किंवा समस्येची तक्रार थेट सरकारकडे करणे शक्य झाले आहे. कारण सरकारने आता थेट जनतेला तक्रार करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार केली असून या माध्यमातून तुम्ही अवघ्या 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून तक्रार करू शकता.
आपल्याला अनेकदा असे दिसून येते की, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा कृषि विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरवठा विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाशी संबंधित काही तक्रार असल्यास किंवा समस्या असल्यास आपल्याला जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांकडे जावून तक्रार करावी लागते.
जिल्हास्तरावर संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यासाठी जाण्यायेण्यात वेळ व पैसा खर्च होतो, शिवाय तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेतली जाईलच याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे अनेकदा नागरिकांना काय करावे हा प्रश्न पडतो. म्हणजेस सदरील प्रश्न किंवा समस्या जैसेथेच दिसून येते.
Complaint to Govt
आता चिंता करण्याची गरज नाही, तुमची कोणत्याही विभागाशी संबंधित तक्रार असू द्या, मग ती ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधित असो, सर्व प्रकारच्या तक्रारी आता थेट मोबाईलवर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
तुम्ही अवघ्या 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून थेट शासनाला तुमची तक्रार करू शकता, सदरील तक्रार ही थेट शासनाकडे जात असल्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. शासनाने कोणती वेबसाईट सुरू केली आहे व तक्रार कशी करायची या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….