CMO Maharashtra Whatsapp Chennel : सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व विकासकामांची माहिती तातडीने मिळावी यासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाडून व्हाट्सअॅपचे चॅनल सुरू करण्यात आले आहे. व्हाट्सअॅपने नुकतेच चॅनलची सुविधा सर्वांसाठी सुरू केली असून त्याचा वापर आता मुख्यमंत्री कार्यालया द्वारे सुध्दा सुरू झाला आहे.
आपल्याला माहितच आहे की, व्हाट्सअॅपचे राज्यात लाखो किंबहुना कोट्यावधी वापरकर्ते आहेत, स्मार्टफोन वापरणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती हा व्हाट्सअॅपचा वापर करतच असतो, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून संदेश, इमेज, ऑडीओ, व्हिडीओ, पीडीएफ इत्यादी सहज पाठवता येते. सोशल मीडिया म्हणून राज्यातील असंख्य नागरिक याचा वापर करतात.
ज्या प्रमाने टेलिग्रामवर चॅनल सुरू करण्याची सुविधा होती, तशी सुविधा आतापर्यंत व्हाट्सअॅप मध्ये नव्हती, परंतू आता व्हाट्सअॅपने सुध्दा चॅनल सुरू करण्याची सुविधा सर्वांसाठी खुली केली आहे. आधी व्हाट्सअॅप मध्ये ग्रुपची सुविधा होती, मात्र त्यात 1025 सदस्यांनाच अॅड करता येत होते.
CMO Maharashtra Whatsapp Chennel
आता व्हाट्सअॅपने ज्या चॅनलची सुविधा सुरू केली आहे त्यात हजारो नव्हे तर लाखो आणि त्यापेक्षाही जास्त लोकांना अॅड होणे शक्य आहे, विशेष म्हणजे या चॅनल मध्ये राज्यातूनच नव्हे तर देशभरातून कोणीही व्यक्ती चॅनल सर्च करून स्वत: अॅड होवू शकतो. या चॅनलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लाखो लोकांपर्यंत माहिती एकाच चॅनलच्या माध्यमातून क्षणात पोहोचवणे शक्य होणार आहे. चॅनलला जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…