25 हजारात कोणता व्‍यवसाय सुरू करता येईल ? माहिती खालील प्रमाणे…

मित्रांनो, कोणताही व्‍यवसाय हा छोटा नसतो, छोट्या व्‍यवसायातून माणूस मोठा होत असतो, आपल्‍याकडे भांडवल नसेल तर आपण कमी पैशात सुध्‍दा व्‍यवसाय करू शकतो. अनेकांना छोटा किंवा रस्‍त्‍यावर करता येणारा व्‍यवसाय म्‍हटले की, त्‍यांना कमीपणा वाटत असतो, मात्र मोठमोठ्या उद्योगपतींची कहानी ऐकली तर त्‍यांनीही त्‍यांच्‍या अडचणीच्‍या काळात छोटे व्‍यवसाय करूनच पुढे प्रगती केल्‍याचे आपल्‍याला आढळून येईल.

25 हजारात कोणता व्‍यवसाय करावा ?

कमी पैशात अनेक व्‍यवसाय करता येतात, त्‍यापैकीच एक म्‍हणजे कार वॉशिंगचा व्‍यवसाय आहे. आपण हा व्‍यवसाय कोठेही करू शकता. हा व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी एका मशीनची आवश्‍यकता असते, बाजारात विविध किंमतीच्‍या मशीन आहेत, मात्र सामान्‍यत: कार वॉशिंग मशीन 12 हजारापासून सुरूवात होते. आपण नवीन असल्‍यास सुरूवातीला कमी किंमतीच्‍या मशीनपासून सुरूवात करता येईल.

तसेच 2 हॉर्स पावरची मोटर घ्‍यावी लागेल, ज्‍याला 2 हजार रूपये लागतात, तसेच साधारण 9 ते 10 हजार रूपयात एक 30 लिटर कॅपेसिटी असलेला व्‍हॅक्‍यूम क्लिनर मिळेल, योबतच वॉशिंगचं चिल्‍लर सामान म्‍हणजे शॅम्‍पू, ग्‍लोव्‍हज, टायर पॉलिश, डॅशबोर्ड पॉलिशचा 5 लिटरचा कॅन असे काही आवश्‍यक सामान लागेल, यासाठी 2 हजार रूपये खर्च येईल.

असा एकूण 25 हजाराचा खर्च लागेल, महागड्या मशीन किंवा वस्‍तू नाही घेतल्‍यास एवढ्या पैशात आपला व्‍यवसाय सुरू होवू शकतो. हा व्‍यवसाय सुरू करतांना योग्‍य जागेची निवड करावी, शक्‍यतो मेकॅनिकची दुकान असेल अशा भागात किंवा रस्‍त्‍याच्‍या कडेला जागा पाहून आपण व्‍यवसाय सुरू करू शकता. स्‍वत:ची जागा नसेल तर आपण भाडे तत्‍वावर जागा घेवून व्‍यवसाय सुरू करू शकता.

किती कमाई होईल ?

जर ग्रामीण भाग असेल तर छोट्या कार वॉशिंगसाठी दिडशे रूपयापर्यंत चार्ज घेतले जाते. तसेच जर शहरी भाग असेल तर छोट्या कारसाठी 250 रूपयापर्यंत वॉश केल्‍या जातात, तसेच मोठ्या कार किंवा वाहन असल्‍यास 350 ते 450 रूपयापर्यंत वॉश करण्‍याचा दर घेतला जातो. म्‍हणजेच ग्रामीण व शहरी भागानुसार आणि वाहनानुसार कमाई कमी अधिक होवू शकते. साधारण 50 हजार च्‍या आसपास महिन्‍याला कमाई होवू शकते.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!