महाराष्ट्रात अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे म्हणजेच नोंदणीकृत (सक्रीय) कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नोंदणीकृत कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या (पती / पत्नी) नावावर असलेल्या जागी घर बांधण्यासाठी 1 लाख 50 हजार रूपये अनुदान देण्यात येत आहे. कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी सुध्दा हे अनुदान दिले जाणार आहे.
सदरील कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असावा, शिवाय एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा, कामगाराचे वय 18 ते 60 दरम्यान असावे, सदरील कामगाराने वर्षभरात 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. ज्यांना पक्के घर नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे बांधकाम कामगार म्हणून दिलेले प्रमाण असावे. मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, बँकेच्या पासबुकची प्रत. आधारकार्ड, रहीवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा शासनाच्या https://mahabocw.in या वेबसाईटला भेट द्यावी.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.