मिडीया रिपोर्ट नुसार सध्या बजाज कंपनी CNG Bike आणण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये विविध मॉडेल्स असू शकतात. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे ग्राहक पर्यायी इंधनाकडे बघू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय उपलब्ध होणे शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही इंधन असणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या कंपनीने कोणते मॉडेल सीएनजी मध्ये लॉन्च करणार याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, अर्थातच त्यामुळे सदरील सीएनजी बाईकची किंमतही समोर आलेली नाही. परंतू येत्या काही दिवसात सीएनजी बाईक बाजारात दिसू शकेल अशी शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. असे झाल्यास बजाज ही भारतातील सीएनजी बाईक बनवणारी पहिली कंपनी ठरेल.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.