बजाज लवकरच आपली नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. बजाज आपले Bajaj CT 100 चे EV मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार या बाईम मध्ये 4.4 क्षमतेची लिथियम आयन बॅटरी असेल, इतर इलेक्ट्रिक वाहनांना फुल चार्जिंगसाठी 5 तास लागतात, मात्र ही बाईक फक्त 2 तासात फुल चार्ज होईल असे सांगण्यात येत आहे.
सदरील बाईक ही एकदा चार्ज केल्यावर 120 ते 150 कि.मी. चालेल, बाईक मध्ये डिस्क ब्रेकचा ऑप्शन देण्यात येणार आहे. तसेच या बाईक मध्ये राईडिंग मोड, तसेच ब्लूटूथ, नेविगेशन आणि मोबाईल कनेक्टीवीटी असेल. शिवाय युएसबी चार्जिंग पोर्ट सुध्दा असेल. ज्याच्या सहाय्याने आपण कुठेही मोबाईल चार्ज करू शकता.
या सुविधेच्या व्यतिरिक्त स्पीडोमिटर, डिजीटल ऑडोमीटर तसेच इतरही आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. सदरील देण्यात आलेली माहिती ही विविध वेबसाईट किंवा माध्यमांमध्ये आलेली आहे. अर्थात सदरील बाईक किंवा त्याच्या फिचर्स व किंमती बद्दल कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तरीही माध्यमात प्रकाशित माहितीनुसार या बाईकची किंमत अंदाजे 85 हजार ते 90 हजार असू शकते. सदरील बाईक अजून लॉन्च झालेली नाही मात्र त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.