Your Alt Text

राज्‍यात राजकीय भुकंप ! राष्‍ट्रवादी मध्‍ये उभी फूट ! अजीत पवारांसह 9 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ! | Ajit Pawar Became Deputy Chief Minister

Ajit Pawar Became Deputy Chief Minister : राज्‍यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. गेल्‍या अनेक दिवसांपासून राज्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्‍या आणि आता एक प्रकारे राज्‍यात राजकीय भुकंप पहायला मिळत आहे. कारण राष्‍ट्रवादीचे महत्‍वाचे नेते अजित वार यांनी शिंदे-फडणवीस सरकार मध्‍ये थेट शपथ घेतली आहे.

Ajit Pawar Became Deputy Chief Minister

अजीत पवार यांनी उपमुख्‍यमंत्री तर इतर 8 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्‍यासोबत अनेक आमदार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. अधिकृत आकडा समोर आलेला नाही, परंतू मिडीया मध्‍ये आलेल्‍या रिपोर्टनुसार 30 पेक्षा जास्‍त आमदार अजित पवार यांच्‍या सोबत असल्‍याचे समजते.

सदरील झालेला राजकीय भुकंप अनेकांना आश्‍चर्यचकीत करणारा आहे. याआधी अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता, परंतू त्‍यावेळी राष्‍ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे त्‍यांना परत आणण्‍यात यशस्‍वी झाले होते, त्‍यावेळी त्‍यांनी फक्‍त स्‍वत:च शपथ घेतली होती, मात्र यावेळी त्‍यांच्‍यासह 9 जणांनी शपथ घेतली आहे.

कोणी घेतली मंत्रीपदाची शपथ ?

शिंदे – फडणवीस सरकारमध्‍ये शपथ घेतलेल्‍या नेत्‍यांमध्‍ये अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबीनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

आम्‍हीच पक्ष !

अजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्‍पष्‍ट केली असून आपणच राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहोत आणि यापुढील निवडणुका शिंदे – फडणवीस यांच्‍यासोबत लोकसभा व विधानसभेच्‍या निवडणुका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या चिन्‍हावरच लढणार असल्‍याचे सांगितले आहे. शिवाय पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारीही आमच्‍यासोबत असल्‍याने त्‍यांनी सांगितले. याचाच अर्थ त्‍यांनी आता राष्‍ट्रवादीवर सुध्‍दा दावा केला असून आता ते शिंदे यांच्‍या पावलावर पाऊल ठेवत असल्‍याचे दिसत आहे.

बंडाशी संबंध नाही !

दरम्‍यान या संपूर्ण बंडाशी माझा किंवा पक्षाचा कोणता संबंध नाही अशी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच जे आमदार गेले आहेत त्‍यातील 80 टक्‍के आमदार परत येतील असा दावाही राष्‍ट्रवादीकडून करण्‍यात आला आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

Leave a Comment

error: Content is protected !!