कृषि विभागा अंतर्गत राज्यात 218 पदांसाठी भरती केली जाणार असून यामध्ये वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधिक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदांचा समावेश आहे.
लघुलेखक साठी शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून लघुलेखन किमान 80 शब्द प्रति मिनट व इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनट आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी) शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून लघुलेखन किमान 100 शब्द प्रति मिनट व इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनट आवश्यक आहे.
लघुलेखक (उच्चश्रेणी) शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून लघुलेखन किमान 120 शब्द प्रति मिनट व इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनट आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपीक पदासाठी किमान द्वितीय श्रेणीतून पदवी असणे आवश्यक असून सहायक अधिक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट) आहे. वेतनश्रेणी 81,000 ते 142,000 च्या दरम्यान राहणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे. अधिक माहितीसाठी शासनाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.