शासनाने शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला आहे ? माहिती खालील प्रमाणे…

शेतकऱ्यांना शासनाच्‍या विविध कृषि योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविण्‍यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्‍यवस्‍थापन, कृषि पुरक व्‍यवसाय इत्‍यादी बाबतचे मार्गदर्शन उपलब्‍ध व्‍हावे, कृषि प्रदर्शन, कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी / उद्योजकांची व्‍याख्‍याने, यशस्‍वी शेतकरी, शास्‍त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि विचारवंत यांची भेट घडावी.

तसेच सर्वसामान्‍य शेतकऱ्यांना शंकांचे निरसन करून घेता यावे, उत्‍पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्‍पनेवर आधारीत धान्‍य व खाद्य महोत्‍सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्‍सव इत्‍यादीचे आयोजन करण्‍यासाठी जिल्‍हा कृषि महोत्‍सव योजना सुरू करण्‍यात आली आहे.

या माध्‍यमातून शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र यांचे मार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्‍ध होणार आहे तसेच शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीचीही संधी मिळणार आहे या दृष्‍टी सदरील जिल्‍हा कृषि महोत्‍सव योजना सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्‍कीच फायदा होणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!