राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी ट्रॅव्हल्स, बसेसची तपासणी करण्यात आली, यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेस विरूध्द कार्यवाही करण्यात आली.
तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, वायपर, टेल लाईट इत्यादी गुन्ह्यांसाठी 1702 बसेसवर कार्यवाही करण्यात आली. विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भग करून वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर कार्यवाही करण्यात आली. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 बसेसवर तसेच 514 बसेस मध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आल्याने या सर्व वाहनांवर कार्यवाही करण्यात आली.
या तपासणी दरम्यान विविध गोष्टी तपासण्यात आल्या, ज्यांचा भग करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली. राज्यभात करण्यात आलेल्या कार्यवाही मध्ये सदरील वाहनधारकांकडून 1 कोटी 83 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.