छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र कुत्र्याने माजी महापौरांचा 15 हजाराचा बूट घरातून नेल्याचे जेव्हा महापालिकेच्या यंत्रणेला कळाले, तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी शहरभर मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली.
अनेक मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्यात आले, प्राप्त माहितीनुसार काही कुत्र्यांची तर नसबंदी सुध्दा करण्यात आली आहे. ज्या कुत्र्याने बूट नेला होता तो बराच शोध घेवून सापडत नव्हता, अखेर बूट नेतांना सीसीटीव्हीत दिसत असलेले मोकाट कुत्रे पुन्हा त्या भागात दिसले आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जेरबंद केले. प्राप्त माहितीनुसार बूट घेवून जाणारा कुत्रा सुध्दा सापडला आहे. मात्र अद्यापपर्यंत सदरील बूट सापडले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जेवढी तत्परता महापालिकेने माजी महापौर यांच्या प्रकरणात दाखवली तेवढीच तत्परता इतर सर्वसामान्य नागरिकांचा कॉल गेल्यावर किंवा नागरिकांनी तक्रार केल्यावर महापालिकेने दाखवली तर बरे होईल असे नागरिकांमधून बोलले जात आहे. कारण मोकाट कुत्र्यांचा त्रास अजून संपलेला नाही, लहान मुलांसह नागरिकांनाही मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने किमान पुढील काळात तरी नागरिकांच्या तक्रारीवर अशीच तत्परता दाखवावी एवढीच माफक अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.