केंद्र शासनाच्या पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 चा हप्ता मिळत होता, म्हणजेच वर्षाला 6 हजार रूपये मिळत होते. आता राज्य सरकारने नमो शेतकरी सम्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना 2 हजाराचे 3 हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2 हजार व नमो शेतकरी सम्मान योजनेचे 2 हजार असे एकूण 4 हजाराचा हप्ता मिळणार आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेसाठी सुध्दा पात्र आहेत.
राज्य सरकारने PM Kisan Yojana प्रमाणेच नमो शेतकरी सम्मान योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचे 6 हजार व राज्य सकारचे 6 हजार असे एकूण 12 हजार रूपये वर्षाला मिळणार आहेत. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र यापूर्वीचा पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आला होता, त्यामुळे लवकरच 14 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचे 2 हजार व आता राज्य सरकारने जीआर काढला असल्यामुळे राज्य सरकारच्या नमो शेतकरी सम्मान योजनेचे 2 हजार असे एकूण 4 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.