Your Alt Text

ड्रोनद्वारे अवघ्‍या 7 मिनिटात एक एकर पिकांवर औषध फवारणी ! सरकार अनुदान देणार ! | Spraying Crops by Drone

Spraying Crops by Drone : आतापर्यंत आपण लग्‍न कार्यात किंवा इतर ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डींग, शुटींग करण्‍यासाठी ड्रोन पाहीले असेल, परंतू आता शेतातील पिकांवर औषध फवारणीसाठी सुध्‍दा ड्रोनचा वापर करण्‍यात येत आहे. होय हे खरे आहे, कारण आता अवघ्‍या 7 मिनिटात एका एकरवरील पिकांवर औषध फवारणी करणे शक्‍य झाली आहे.

ड्रोनद्वारे औषध फवारणी

सध्‍या पारंपारिक पध्‍दतीने फवारणी करायची असल्‍यास त्‍यासाठी पाठीवरील पंपाचा उपयोग करावा लागतो, यामध्‍ये शेतकरी बांधवांचा बराच वेळ जातो. मोठ्या पिकांवर फवारणी करतांना खबरदारी न घेतल्‍यास सर्पदंश किंवा अन्‍य वन्‍यप्राण्‍यांपासूनही धोका असतो. मात्र आता सोप्‍या पध्‍दतीने म्‍हणजेच ड्रोनच्‍या माध्‍यमातून शेतातील पिकांवर फवारणी करणे शक्‍य झाले आहे.

Spraying Crops by Drone

सध्‍या ज्‍या पध्‍दतीने फवारणी केली जाते त्‍यामध्‍ये अनेकदा शेतकऱ्यांना विषबाधा होण्‍याची शक्‍यता सुध्‍दा असते. मात्र ड्रोनद्वारे फवारणी केल्‍यामुळे अशा प्रकारचा धोका उदभवत नाही, शिवाय साप, विंचू किंवा इतर प्राण्‍यांपासूनही हानी होण्‍याची शक्‍यता नसते. त्‍यामुळे आता ड्रोनद्वारे फवारणी करण्‍यास प्राधन्‍य देण्‍यात येत आहे.

शेतकऱ्यांचा वेळ वाचावा आणि पारंपारिक फवारणीमुळे विषबाधा होवू नये असे विविध कारणे लक्षात घेवून सरकारही ड्रोनद्वारे फवारणीसाठी प्रोत्‍साहन देत आहे. सरकार ड्रोनसाठी किती अनुदान देते व इतर माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

सरकार ड्रोनसाठी किती अनुदान देते ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!