सदरील शेतकरी श्री.पवार यांनी जो फॉर्म्युला बनवला आहे त्यानुसार तुम्हाला जर एखाद्या पिकाला हे पावडर वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हे पावडर जमिनीमध्ये टाकून त्यावर तुम्हाला बियाण्याची लागवड करावी लागेल. बियाणे टाकल्यावर त्यावर साधारणपणे माती टाकून दोन महिन्यापर्यंत संबंधित पिकाला पाण्याची गरज भासणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच दोन महिन्यानंतर जर दहा ते पंधरा मिनिटे ठिबक द्वारे पाणी दिले तरी हा फॉर्म्युला पुन्हा रिचार्ज होतो व परत दिड ते दोन महिन्यापर्यंत काम करतो, त्यामुळे कमी पाण्यात देखील शेती करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील फॉर्म्युला ट्रायलबेस साठी वापरण्यात आला तेव्हा एका एकरसाठी 1000 ते 1200 रूपये इतका खर्च आला, परंतू याबद्दल त्यांनी सांगितले की, जर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले तर ते प्रति एकर फक्त 500 ते 600 रूपये इतकाच येईल असेही त्यांनी सांगितले.
जर श्री.पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा फॉर्म्युला खरंच यशस्वी असल्यास हा फॉर्म्युला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र हा फॉर्मुला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष याचा किती फायदा होतो हे येत्या काळात समजेलच. सदरील श्री.पवार यांच्या संशोधनाची माहिती विविध माध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.