Bajaj CNG Bike : दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे, आतापर्यंत तुम्ही फक्त पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बाईक्स पाहिल्या आहेत, परंतू जगप्रसिध्द भारतीय कंपनी बजाज आता चक्क CNG वर धावणारी बाईक लॉन्च करणार आहे. म्हणजेच तुमचा पेट्रोलवरील खर्च जवळपास 50% कमी होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे वाढत असलेले दर सर्वांनाच धक्का देणारे आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर 100 रूपयांच्या खाली जातांना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे आकर्षित होवू लागले आहेत. सदरील सीएनजी बाईक बाजारात आल्यास हे एक प्रकारचे क्रांतीकारी पाऊल ठरेल.
आपणास माहितीच असेल की, CNG Gas हा एक प्रकारचा नैसर्गिक वायू आहे, याचा उपयोग पेट्रोल, डिझेल आणि LPG ला पर्याय म्हणून वापरला जावू शकतो, CNG मुळे प्रदुषण होत नाही, म्हणजेच त्याचे प्रमाण नगण्य आहे. पेट्रोल व डिझेलमुळे प्रदुषण खूप होते जे पर्यावरणासाठी धोकादायक असते.
Bajaj CNG Motorcycle
CNG चा वापर यापूर्वीच तीन चाकी व चारचाकी गाड्यांमध्ये होत आहे. सीएनजी हे इंधन पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्त असल्यामुळे त्यांच्या तुलनेत याचा खर्च अर्धा आहे. विशेष म्हणजे CNG चे मायलेज पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत जास्त मिळते.
सध्या मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहने दिसून येत आहेत, परंतू त्यांना वारंवार चार्जिंग करण्याची एक समस्या आहे. विशेष म्हणजे चार्जिंग करण्यासाठी वेळ सुध्दा खूप लागतो, येत्या काळात चार्जिंग मध्येही सुधारणा होईलच परंतू आजघडीला ही समस्या आहे. सीएनजी गॅस टाकी मध्ये भरल्यानंतर पुढील प्रवास सहज करणे शक्य होते. आता जागोजागी सीएनजी पंप होत आहेत.
Bajaj CNG Bike
याबाबत कंपनीचे एमडी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, CNG Motorcycle खरेदी आणि इंधन दोन्ही बाबतीत स्वस्त होतील, म्हणजेच ज्यांना पेट्रोलचे दर परवडत नाही अशा लोकांसाठी हा पर्याय नक्कीच चांगला असणार आहे. CNG गॅसवर कोणती बाईक येणार आणि किंमत किती या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…