माळशिरस तालुक्यातील जांभूळ या गावचे अण्णा जांभूळ यांनी डाळिंबाची शेती करून 70 लाख रूपये कमवले आहे. श्री.जांभूळ यांनी 1500 झाडांपासून 40 ते 50 टन डाळिंबाचे उत्पन्न मिळवले आहे. सध्या ते डाळिंबाची बांगलादेशात निर्यात करत आहेत.
त्यांना 170 रूपये किलोचा दर मिळत असून अजून त्यांना 1500 झाडांपासून एक कोटीच्या वर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. साधारणपणे त्यांनी 3000 डाळिंबाच्या झाडांची लागवड केली असून त्यांना व्यवस्थापन व इतर बाबींवर सुमारे साडेचार लाख रूपये खर्च आहे.
श्री.जांभूळ यांना आतापर्यंत जे उत्पन्न मिळाले आहे ते 1500 झाडांचे आहे, यातूनच त्यांना 70 लाखांचे उत्पन्न झाले आहे. कष्टासह मार्केटची योग्य ती माहिती, योग्य ते नियोजन, आधुनिकतेची जोड देत त्यांनी मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.