Your Alt Text

आता व्‍हाट्सअॅपवर स्‍वत:चे चॅनल सुरू करता येणार ! लाखो लोकांना मॅसेज पाठवता येणार ! | How Create Whatsapp Channel

How Create Whatsapp Channel : व्‍हाट्सअॅप वापरकर्त्‍यांसाठी खुशखबर आहे, कारण व्‍हाट्सअॅपने आपल्‍या User साठी Whatsapp Channel नावाची सुविधा लॉन्‍च केली आहे. तुम्‍हाला प्रश्‍न पडला असेल की, What is Whatsapp Channel ? how to Create Channel in Whatsapp ? How to Find channel whatsapp ? तर या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे आपणास या आर्टीकल मध्‍ये मिळतील.

What is Whatsapp Channel ?

व्‍हॉट्सअॅप ने एक भन्‍नाट फिचर लॉन्‍च केले असून सदरील फीचर भारतासह जगभरातील 150 देशांमध्‍ये लॉन्‍च करण्‍यात आले आहे. Whatsapp Channel feature मुळे वापरकर्त्‍याला ब्रॉडकास्‍ट चॅनल सुरू करता येईल. तुम्‍ही जर Telegram वापरले असेल तर तुम्‍हाला माहित असेल की, त्‍यात चॅनल बनवायची सुविधा आहे.

आता व्‍हाट्सअॅपनेही आपल्‍या वापरकर्त्‍यांसाठी Channel बनवण्‍याची सुविधा आणली आहे. यासाठी दुसरे कोणतेही अॅप घेण्‍याची गरज नाही. विशेष म्‍हणजे या चॅनलच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही हजार दोन हजार नव्‍हे तर लाखो लोकांना या चॅनल मध्‍ये जोडू शकता, शिवाय देशभरातील कोणीही या चॅनलला सर्च करून या मध्‍ये अॅड होवू शकते.

व्‍हाट्सअॅप चॅनलमुळे अॅडमीनला एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत आपली माहिती, मॅसेज, फोटो, व्हिडीओ शेअर करता येणार आहे. एवढंच नव्‍हे अॅडमीनला काही अधिकार सुध्‍दा देण्‍यात आलेले आहेत जेणेकरून ते कोणाला घ्‍यायचे किंवा घ्‍यायचे नाही याचाही अधिकार असेल.

What is Difference in Whatsapp group and Channel

व्‍हाट्सअॅप ग्रुप मध्‍ये तुम्‍ही फक्‍त 1024 लोकांना अॅड करू शकता, शिवाय तुमचा ग्रुप नवीन व्‍यक्‍तीला माहित होत नाही, जेव्‍हा तुम्‍ही लिंक शेअर कराल तेव्‍हाच तो ग्रुप मध्‍ये जॉईन होवू शकतो किंवा तुम्‍हाला त्‍याला अॅड करावे लागते. परंतू Whatsapp Channel मध्‍ये असे नाही, यामध्‍ये तुम्‍ही हजार नव्‍हे तर लाखो लोकांना अॅड करू शकतात.

तुम्‍ही अॅड नाही केले तरी तुम्‍ही इतरांना ग्रुप मध्‍ये जॉईन होण्‍याचा पर्याय सुरू करू शकता, जेणेकरून तुमच्‍या चॅनलमध्‍ये देशभरातील कोणीही सर्च बटनाचा वापर करून तुमचा चॅनल शोधू शकतो. ग्रुप मध्‍ये तुम्‍ही फक्‍त हजार लोकांपर्यंत मॅसेज पाठवू शकता, परंतू चॅनलच्‍या माध्‍यमातून एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत मॅसेज पाठवता येतील.

Whatsapp Channel Benefits

व्‍हाट्सअॅप चॅनलचे अनेक फायदे आहेत. तुम्‍ही राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी असाल, तुमची संघटना असेल, तुमचे वर्तमानत्र असेल, तुमचे न्‍यूज चॅनल असेल, तुमचे न्‍यूज पोर्टल असेल किंवा तुम्‍ही पत्रकार असाल, तुमचे तुमची कंपनी असेल, तुम्‍ही व्‍यापारी असाल, तुम्‍ही अभिनेता किंवा कोणत्‍याही क्षेत्रातील व्‍यक्‍ती असाल तर तुम्‍हाला तुमचे फॉलोवर्स वाढवण्‍यासाठी हा सर्वात प्रभावी पर्याय ठरणार आहे. कारण एकाच वेळी तुम्‍ही लाखो लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचू शकणार आहात.

उदाहरणार्थ तुम्‍ही एखादे प्रसिध्‍द व्‍यक्‍ती असाल तर तुम्‍हाला देशभरातील तुमचे फॉलोवर्स बनवता येतील, त्‍यांच्‍यापर्यंत तुमची माहिती पोहोचवता येईल, तुम्‍ही त्‍या लाखो लोकांपर्यंत तुमचा संदेश, फोटो, व्हिडीओ, बातमी किंवा इतर माहिती क्षणात पोहोचू शकणार आहात.

व्‍हाट्सअॅप चॅनल कसे सुरू करायचे ? येथे क्लिक करा…

Whatsapp Channels List

जेव्‍हा एखाद्या वापरकर्त्‍याला तुमचा चॅनल शोधायचा असेल तेव्‍हा तो सर्च बटनावर क्लिक करून तुमचा चॅनल शोधू शकतो, तुमच्‍या चॅनलच्‍या नावाशी मिळते जुळते चॅनलची लिस्‍ट यावेळी दिसेल. सदरील लिस्‍ट मधून चॅनल जॉईन करता येते.

Find Channel Whatsapp

व्‍हाटसअॅप चॅनल शोधण्‍यासाठी सर्च बटनावर क्लिक करावे लागेल, त्‍यामध्‍ये अनेक चॅनलचे नाव दिसतील त्‍यापैकी कोणताही चॅनल जॉईन करता येईल.

How Create Whatsapp Channel

आता सर्वात महत्‍वाचा प्रश्‍न हा आहे की, व्‍हाटस चॅनल कसे सुरू करावे ? चॅनल कसे सुरू करता येईल ? चॅनल कोणाला सुरू करता येईल तर या प्रश्‍नाचे उत्‍तर जाणून घेण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप चॅनल कसे सुरू करायचे ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!