राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागा मार्फत विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत महिलांना या योजनेच्या माध्यमातून महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, मिनी दाल मिल, मसाला कांडप मशीन इत्यादी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ज्या महिलांनी मागील 5 वर्षात सदरील योजनेचा लाभ घेतला नसेल अशा महिलांना यासाठी अर्ज करता येईल. एका लाभार्थ्यास केवळ एकाच योजनेसाठी अर्ज करता येईल. प्राप्त माहितीनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 12 वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड, घराचा 8 अ उतारा, विहीत नमुन्यातील अर्ज, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, वीज बील, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
सदरील योजनेचा लाभ सध्या केवळ अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलांना किंवा मुलींना घेता येईल. सदरील महिलांना पिठाची गिरणी, मसाला कांडप, शिलाई मशीन किंवा मिनी दाल मिल घेण्यासाठी 90% अनुदान मिळणार असून 10 टक्के रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका स्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालयाला भेट द्यावी.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.