सदरील पुणे – औरंगाबाद हा महामार्ग अनेक गावे आणि तालुक्यातून जाणार आहे. तसेच हा मार्ग प्रवेश नियंत्रित मार्ग देखील राहणार आहे. भविष्यात हा महामार्ग दिल्ली – मुंबई या महामार्गाशी कनेक्ट करण्याचा सुध्दा विचार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे – औरंगाबाद महामार्गामुळे 4 तासांचा प्रवास अवघ्या 2 तासा पूर्ण करता येणार आहे. हा हायवे मराठवाड्यातील कृषि, औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण ठरणार आहे.
भारतमाला परियोजने अंतर्गत होणारा हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका, पारनेर तालुका, नगर तालुका, पार्थी तालुका, शेवगाव तालुका, पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, हवेली तालुका, पुरंदर तालुका, दौंड तालुका, शिरूर तालुका आणि या तालुक्यातील अनेक गावांमधून जाणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.