Your Alt Text

पुणे – औरंगाबाद प्रवास होणार आता फक्‍त 2 तासात ! या तालुक्‍यातून जाणार हायवे ! | Pune Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : देशभरात मागील काळात राष्‍ट्रीय महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्‍तारले आहेत, विशेष करून महामार्ग व परिवहन मंत्रालय जेव्‍हापासून नितीन गडकरी यांच्‍याकडे आले आहे तेव्‍हापासून देशांतर्गत रस्‍ते हे कधी नव्‍हे एवढ्या गतीने होवू लागले आहेत.

ज्‍या तालुक्‍यात साधे रस्‍ते नव्‍हते त्‍या भागात हायवे होत असल्‍याने सदरील परिसराचा विकासही झपाट्याने होण्‍यास मदत होत आहे, रोजगाराच्‍या संधी निर्माण होत आहेत. कारण ज्‍या गावांना किंवा शहरांना चांगले रस्‍ते असतात त्‍या परिसराचा विकास झपाट्याने होत असतो, कारण दळणवळणाची सुविधा निर्माण झाल्‍यास अनेक संधी निर्माण होत असतात.

New Aurangabad Pune Highway

आता केंद्र शासनाने महत्‍वपूर्ण अशा भारतमाला परियोजना (Bharatmala Project) अंतर्गत देशभरातील हजारो कि.मी.चे महामार्ग करण्‍याचा निर्णय घेतला आहे, विशेष म्‍हणजे या परियोजना अंतर्गत विकसित होणारे सर्व महामार्ग हे ग्रीनफील्‍ड कॉरिडोर राहणार आहेत. या मध्‍ये महाराष्‍ट्रातीलही काही महामार्गांचा समोवश करण्‍यात आला आहे.

आता पुणे – औरंगाबाद हा महामार्ग देखील या परियोजने अंतर्गत करण्‍यात येणार आहे. अर्थातच हा महामार्ग देखील ग्रीनफिल्‍ड एक्‍सप्रेसवे राहणार असून राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्‍यात येणार आहे.

Pune Aurangabad Expressway

पुणे हे शिक्षणाचे माहेर घर असून राज्‍याची सांस्‍कृतिक राजधानी म्‍हणूनही पुण्‍याला ओळखले जाते, तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे देखील मराठवाड्याचे मुख्‍यालय असून औद्योगिक, धार्मिक तसेच पर्यटनाच्‍या दृष्‍टीनेही हे महत्‍वाचे शहर आहे. शिवाय पुण्‍याहून औरंगाबादकडे आणि औरंगाबादहून पुण्‍याकडे जाणाऱ्या लोकांची संख्‍या खूप मोठी आहे.

सदरील रस्‍त्‍याची एकूण लांबी 225 किलामिटर एवढी राहणार असून रूंदी 70 मिटर राहणार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. आजघडीला औरंगाबाद ते पुणे हा प्रवास पूर्ण करण्‍यासाठी जवळपास 4 तास लागतात, परंतू हा हायवे झाल्‍यानंतर अवघ्‍या 2 तासात पुणे ते औरंगाबाद प्रवास होणार आहे.

पुणे-औरंगाबाद हायवे कोणत्‍या तालुक्‍यातून जाणार ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!