सदरील घटना ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील आहे. येथील सरपंच पुष्पा निगळे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. यामुळे राजतीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंचांना अपात्र ठरवण्यात यावे यासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
कारण काय ?
ज्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे त्या सरपंच पुष्पा निगळे यांनी ग्रामपंचायतची मालकी असलेल्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचा तक्रार माजी सरपंच गणपतराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
सदरील प्रकरणावर दावे प्रतिदावे दाखल होवून यावर युक्तीवाद झाला. तसेच अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनीही आपला अहवाल सादर केला, जिल्हाधिकारी यांना सदरील प्रकरणात अतिक्रमण झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी सदरील सरपंच यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ज-3) व 16 प्रमाणे अपात्र ठरवले आहे.
सदरील सरपंचांना निर्णयाविरूध्द विभागीय आयुक्त यांच्याकडे 15 दिवसाच्या आत अपील करण्याचीही मुदत देण्यात आली आहे. सदरील प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अतिक्रमणामुळे सरपंच पद तसेच उपसरपंच किंवा सदस्य पद सुध्दा धोक्यात येवू शकते याचा अंदाज अनेकांना आला आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.