महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Nagpur Mumbai Bullet Train चे काम सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भापासून मुंबईपर्यंत येणारे जिल्हा आणि जवळपासच्या जिल्हयांना सुध्दा या बुलेट ट्रेनचा फायदा होणार आहे.
Nagpur Mumbai High Speed Bullet Train
नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी 766 राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलेट ट्रेनचा ताशी 320 राहणार आहे मात्र प्रत्यक्षा 250 कि.मी. प्रति तास वेग मिळणार आहे. प्रकल्पाकरीता एका किलोमिटर करीता 200 कोटी रूपये इतका येणार असून एकूण 1 ते दिड लाख कोटी रूपये खर्चाचा अंदाज आहे.
Mumbai Nagpur Bullet Train
सदरील प्रकल्पाचा प्रस्ताव 2019 मध्येच तयार करण्यात आला होता, त्यानंतर मार्च 2021 मध्ये या प्रकल्पाचा हवाई लीटर सर्वे देखील करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यात आला होता तसेच मार्च 2022 मध्ये डीपीआर तयार करून रेल्वे बोर्डाकडून तो सादर करण्यात आला होता.
Nagpur Mumbai Bullet Train
आपणास माहितच आहे की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर राज्याची सुध्दा राजधानी आहे. शिवाय नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मुळे दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे.
या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी सुध्दा निर्माण होणार आहेत. शिवाय पर्यटनाला सुध्दा चालणा मिळणार आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला सुध्दा यामुळे चालना मिळणार आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन कोणत्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जाणार आहे या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…