सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. सदरील योजनेच्या माध्यमातून विविध किलोवॅटचे पॅनल लावता येवू शकतात, सामान्यत: 2 किलोवॅटचे सोलर लावले तरी घराच्या वीज बिलाची चिंता मिटू शकते.
एकदा सोलर पॅनल लावल्यास 20 ते 25 वर्षे वीज बिलाची चिंता राहणार नाही. कारण हे पॅनल अनेक वर्षे टिकतात. कंपनीनुसार किंमतीत थोडाफार बदल असू शकेल, प्राप्त माहितीनुसार 2 किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रूपये खर्च येतो, त्यातील 40 टक्के म्हणजेच 48000/- अनुदान मिळते. याचाच अर्थ आपल्याला 72 हजारच्या आसपास खर्च यतो.
सदरील सोलर पॅनल 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के सबसीडी दिली जाते. तसेच जर 10 किलोवॅटपर्यंत पॅनल घेतल्यास 20 टक्के सबसीसीडी दिली जाते. अधिक माहितीसाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.