सदरील यामाहाची स्कूटर तुम्ही पेट्रोलवरही चालवू शकता आणि बॅटरीवरही चालवू शकता. म्हणजेच ही स्कूटर पेट्रोल संपले तर बॅटरीवर चालू शकते आणि बॅटरी संपली तर पेट्रोलवर चालू शकते. या स्कूटर मध्ये ब्लूटूथ कनेक्टीवीटी सुध्दा आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या स्कूटरची किंमत किती आहे ? तर याचे उत्तर आहे. महाराष्ट्रात याची साधारण एक्स शोरूम किंमत 81273 आहे. या स्कूटरला तुम्ही डाउनपेमेंट देवूनही खरेदी करू शकता, साधारण 6000 रू. डाउनपेमेंट करूनही ही स्कूटर घरी आणता येईल. बाकीचे पैसे हप्त्याने भरता येतील.
सदरील स्कूटर मध्ये पेट्रोल आणि बॅटरी असे दोन्ही पर्याय दिले आहेत, पेट्रोलवर साधारण 60 ते 65 मायलेज मिळेल असे सांगण्यात येत आहे, मात्र ही स्कूटर पेट्रोल संपल्यावर बॅटरीवर किती किमी धावू शकते याबाबत माहिती कळू शकलेली नाही. जर बॅटरीवर सुध्दा अनेक किमी धावणार असेल तर या स्कूटरचा विचार करता येईल.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.