Yamaha Fascino 125 Hybrid : आजच्या घडीला भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारच्या स्कूटर उपलब्ध आहेत, मात्र अनेकांना प्रश्न पडतो की, नेमकी स्कूटर घ्यावी कोणती ? कारण दोघांमध्ये काही ना काही कमतरता असते. पेट्रोलची स्कूटर घ्यावी तर पेट्रोलचे वाढलेले दर परवडत नाही आणि इलेक्ट्रिकची स्कूटर घ्यावी तर चार्जिंग संपल्यावर कुठे चार्ज करावी हा प्रश्न असतो.
दोन्ही प्रकारच्या स्कूटर मध्ये काही प्रमुख गोष्टींची कमतरता दिसून येते, मात्र जर दोन्ही गोष्टी एकाच स्कूटर मध्ये असतील तर किती चांगले होईल. आता अशीच टू इन वन स्कूटर बाजारात आली आहे, म्हणजेच ही स्कूटर बॅटरीवर सुध्दा चालेल आणि पेट्रोलवर सुध्दा चालेल.
Yamaha fascino 125 fi hybrid
सदरील स्कूटर ही यामाहा कंपनीने मार्केट मध्ये आणली असून ही हायब्रीड स्कूटर आहे, म्हणजेच पेट्रोल आणि बॅटरी दोन्हीवर चालणारी ही स्कूटर आहे. आपण त्याला इलेक्ट्रिक + पेट्रोल असेही म्हणू शकतो. या स्कूटर मध्ये 125 cc इंजिन आहे. लाईटचा फोकसही चांगला आहे, स्कूटरचा डिझाईन सुध्दा आकर्षक बनवण्यात आला आहे.
Yamaha Fascino 125 Hybrid
स्कूटर मध्ये डिजिटल मिटर असल्यामुळे विविध प्रकारची माहिती दिसते, स्कूटरचे वजन 99 kg आहे. सीटच्या खाली मोठा स्टोरेज आहे, ज्यामध्ये वस्तू ठेवता येतात, जवळपास 7 कलर मध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. या स्कूटरची किंमत व इतर माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….