Dragon Fruit Plant : शेती करतांना अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अनेक वेळा तर लावलेला खर्च सुध्दा निघत नसल्याचे परिस्थिती दिसून येते, कधी आस्मानी तर कधी सुल्तानी अशा संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो, पारंपारिक शेतीतून वारंवार होत असलेली निराशा पाहून देशातील अनेक शेतकरी आता इतर पर्यायांचा विचार करू लागले आहेत.
नेहमी शेतीतून होणारे नुकसान पाहता शेतकरी हैरान झाल्याचे चित्र आहे. शिवाय दिवसरात्र मेहनत घेवूनही शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळेही शेतकरी हतबल दिसून येतात. मात्र आता देशातील अनेक शेतकरी पारंपारिक शेती करण्याऐवजी इतर पर्यायांवर लक्ष देत असल्याचे दिसत आहे.
देशात सध्या ड्रॅगन फ्रुटची शेती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, कारण या फळपिकाने असंख्य शेतकऱ्यांना मालामाल केल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे सदरील ड्रॅगन फ्रुटची लागवड एकदा केल्यानंतर अनेक वर्षे यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकते.
Dragon Fruit Plant
ड्रॅगन फ्रुट हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगला पर्याय असल्यामुळे या फ्रुटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह या फळामध्ये इतरही अनेक पोषक तत्व असल्यामुळे देशात या फळाची मागणी वाढलेली दिसत आहे.