शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण हवामान खात्याने चांगला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भापासून दक्षिण कनार्टकापर्यंत कमी दाबाचा पट्टा जात आहे, यामुळे विदर्भ आणि मराठवाडयात 4 सप्टेंबर पासून चांगला आणि काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यात काही भागात पावसाला सुरूवात झाली असून चालू आठवड्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय कोकण व गोव्यातही हलका ते मध्यम आणि काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. या आठवड्यात राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या अनक वर्षात जो खंड पडला नाही तो ऑगस्ट महिन्यात पहायला मिळाला आहे. मात्र आता हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.