Pik Vima amount : राज्यातील बहुतांश भागात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे, पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आगाऊ रक्कम मिळणार आहे.
यावर्षी अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असतांना पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड 22 ते 35 दिवसांचा झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा बराच खंड पडल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत, पीक विमा योजनेच्या निकषानुसार पावसाचा 21 दिवसाचा खंड पडल्यास व उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट असल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपैकी 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.
Advance Pik Vima amount
संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या दृष्टीने कृषि विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना संबंधित गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अनेक ठिकाणी सर्वेचे काम जवळपास पूर्णही झाले आहेत.
सदरील सर्वेक्षण पीक विम्यासाठी नोंद झालेल्या 14 पिकांसाठी असून सदरील करण्यात येणारे सर्वेक्षण करून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 25% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्या थेट जमा करण्यात येणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.