भारतात नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहन निर्मिती होत आहे. CMERI CSIR Prima ET 11 Electric Tractor लॉन्च झाला आहे. विशेष म्हणजे सदरील ट्रॅक्टर हे स्वदेशी असून या नाविण्यपूर्ण ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. काय आहे या ट्रॅक्टर मध्ये ? कोणत्या सुविधा आहेत याबाबतची माहिती आपणास येथे मिळेल.
आपणास माहितच आहे की, सध्या पेट्रोल किंवा डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, सदरील दर हे सर्वसामान्य नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. डिझेलवर असलेले ट्रॅक्टर वापरल्यास शेतात सदरील ट्रॅक्टरचा वापर करतांना खर्च देखील वाढत असतो.
डिझेलवर होणारा खर्च गृहीत धरल्यास उत्पादन खर्चात देखील वाढ होते, डिझेलवर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देत असल्यामुळे देशातील विविध कंपन्या देखील आता या क्षेत्रात उतरल्या आहेत.
CSIR Prima ET 11 Electric Tractor
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आता CSIR-CMERI ने नवीन स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या ट्रॅक्टरला prima et 11 असे नाव देण्यात आले आहे. सदरील ट्रॅक्टर हे विशेष करून अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
सदरील ट्रॅक्टरचा मुख्य उद्देश कृषि क्षेत्रातील वापराच्या मागणीची पूर्तता करणे हा आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून या ट्रॅक्टरची डिझाईन करण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर फक्त पुरूषांसाठीच नव्हे तर महिलांसाठी सुध्दा उपयुक्त ठरणार आहे. महिलांना अनुकूल असे बदल यात करण्यात आले आहेत.
शेतकरी बांधव या ट्रॅक्टरला घरीच चार्जिंग सुध्दा करू शकतात, ट्रॅक्टरची वजन उलण्याची क्षमता 500 किलो असून वाहतुकीसाठी सुध्दा हे ट्रॅक्टर अनुकूल आहे. हे ट्रॅक्टर 1.8 क्षमतेची ट्रॉली 25 कि.मी. प्रति तास वेगाने ओढून शकते.