वर्षानुवर्षे शेतकरी ऊस दरवाढीसाठी मागणी करत असतात. आता शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. कारण बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी कारखाना शेतकऱ्यांना 2022-23 या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 3411 रूपये इतका उच्चांकी दर देईल अशी घोषणा केली होती.
सदरील घोषणेनंतर माळेगाव सहकारी कारखन्याच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत सभासद असलेल्या ऊस उत्पादकांना 3411 रूपये प्रति टन दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राप्त माहितीनुसार सदरील दर हा सर्वाधिक दर असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इतर कारखान्यांनीही ठरवल्यास शेतकऱ्यांना ते चांगला दर देवू शकतात, मात्र त्यासाठी इच्छाशक्ती असण्याची आवश्यकता आहे. इतर कारखान्यांनीही अशाच प्रकारे चांगला दर दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकते, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.