महिलांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण योजना म्हणजेच Gruha Lakshmi Yojana सुरू केली आहे. ही योजना महिलांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवणार असल्यामुळे या योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे, गृह लक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना दरमहा 2000 रूपये मिळणार आहेत.
रक्षाबंधानाच्या दिवशी सदरील योजनेची सुरूवात करण्यात आली असून यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई मुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फटका बसत आहे, विशेष करून महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. अशावेळी महिलांना आधार देणे आवश्यक असते.
Gruha Lakshmi Yojana
महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेची सुरूवात झाली असून या योजने अंतर्गत जवळपास 1 कोटी महिलांना दर महिन्याला 2000 रूपये मिळणार आहे, विशेष करून गरीब महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
Gruha Lakshmi Scheme
गृहलक्ष्मी योजने अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात थेट 2000 रूपये जमा करण्यात येत आहेत. ज्याची सुरूवात झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागणार असून फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून कागदपत्र सबमिट करावे लागणार आहेत.