सरपंच आणि उपसरंपच यांना आता किती पगार मिळणार ? माहिती खालील प्रमाणे…

गेल्‍या अनेक वर्षांपासून सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्‍याचे शासनाच्‍या विचाराधीन होते, त्‍यानुषंगाने 2019 च्‍या अर्थसंकल्‍पात शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार म्‍हणजेच मानधन वाढवण्‍याचा निर्णय घेतला होता, त्‍यानुसार सरपंच व उपसरपंच यांना पगार मिळणार आहे. खालील पगारामध्‍ये 75% रक्‍कम शासन देणार असून उर्वरित 25% रक्‍कम ग्रामपंचायत स्‍वनिधीतून देईल.

0 ते 2000 लोकसंख्‍येच्‍या गावातील सरपंचांना 3000 रूपये व उपसरपंचांना 1000 रूपये मानधन राहील. 2001 ते 8000 लोकसंख्‍या असलेल्‍या गावाच्‍या सरपंचाना 4000 रूपये व उपसरपंचांना 1500 रूपये मिळतील. तसेच 8001 पेक्षा जास्‍त लोकसंख्‍येच्‍या गाव सरपंचांना 5000 रूपये व उपसरपंचांना 2000 रूपये मानधन राहील…. धन्‍यवाद…. शासनाच्‍या इतर योजना व माहितीसाठी खालील आर्टीकल वाचू शकता…

error: Content is protected !!