ईडी च्‍या अधिकाऱ्याला किती पगार असतो ? अधिकारी होण्‍यासाठी शिक्षण किती लागते ? माहिती खालील प्रमाणे…

सध्‍या सर्वात जास्‍त ज्‍या यंत्रणेची चर्चा होते ती म्‍हणजे ईडी या संस्‍थेची, ईडीची कार्यवाही म्‍हणजे अनेकांना धडकी भरवणारी असते, कारण बहुतांश प्रकरणात ईडीने कार्यवाही केल्‍यानंतर संबंधित व्‍यक्‍तीला जेलची हवा खावी लागते, त्‍यामुळे या संस्‍थेबद्दल अधिक चर्चा ऐकायला मिळते.

ईडीला अनेक अधिकार असतात, आर्थिक गुन्‍हे रोखण्‍यासाठी ईडी प्रयत्‍नशील असते, एखाद्या प्रकरणामध्‍ये कोणी दोषी आढळल्‍यास त्‍या व्‍यक्‍तीची संपत्‍ती जप्‍त करण्‍याचा अधिकार सुध्‍दा या यंत्रणेला असतो. शिवाय इतरही विविध प्रकारचे अधिकार या यंत्रणेला असतात.

ED म्‍हणजेच enforcement directorate, मराठी मध्‍ये अंमलबजावणी संचालनालय असे म्‍हणतात. ईडी मध्‍ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी म्‍हणून भरती होण्‍यासाठी एएससी CGL परीक्षा द्यावी लागते, यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 दरम्‍यान असावे लागते, शिवाय उदमेवार हा कोणत्‍याही मान्‍यताप्राप्‍त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेला असणे आवश्‍यक आहे.

ईडी मध्‍ये थेट भरती होण्‍याबरोबरच, CID, IRS, IAS अशा विविध संस्‍थांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या अधिकाऱ्यांनाही या संस्‍थेत जाता येते, आता अनेकांना प्रश्‍न पडला असेल की, ईडी मध्‍ये कार्यरत असलेल्‍या सहाय्यक अंमलबजावणी अधिकाऱ्याला किती पगार असतो, तर त्‍याचे उत्‍तर 44900 ते 142,000/- आहे. एवढंच नव्‍हे तर अनुभव आणि जेष्‍ठतेनुसार पदाची श्रेणी वाढते आणि पगारही वाढत असतो.

error: Content is protected !!