आईच्या नावावर काही मालमत्ता असेल किंवा आईने मालमत्ता कमावलेली असेल तर त्या मालमत्तेवर वारस देखील असणार हे खरं आहे. जर एखाद्या आईने स्वत:च्या कमाईतून संपत्ती किंवा मालमत्ता कमावली असेल किंवा ती संपत्ती किंवा मालमत्ता तिच्या पतीकडून किंवा वडीलांकडून किंवा आईकडून वारसा हक्काने प्राप्त झाली असेल या संपत्तीची मालक ही आई स्वत: असते.
याचाच अर्थ जर आईची इच्छा असेल तर आई तिच्या मृत्यूपत्राद्वारे तिच्या नावावर असलेली संपत्ती किंवा मालमत्ता कोणालाही देवू शकते, म्हणजेच त्याच्या इच्छेनुसार ती संपत्ती किंवा मालमत्ता मृत्यूपत्र बनवून मुलाला किंवा मुलीला किंवा इतर कोणालाही हस्तांतरीत करू शकते.
पण जर आईचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यूपूर्वी इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र तयार केलेला नसेल तर हिंदु उत्तराधिकार कायद्यानुसार प्रथम श्रेणीतील लोकांना संपत्ती किंवा मालमत्ता मिळू शकते. याचाच अर्थ संबंधित कायद्यानुसार पती, मुलगा, मुलगी, मुलीचे मुले, मुलाची मुले आईच्या संपत्तीत हिस्सा मिळत असतो.
तसेच जर एखाद्या अविवाहीत महिलेच्या नावावर मालमत्ता असेल आणि अशा अविवाहीत महिलेचा मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र न बनवता मृत्यू झाला असेल तर आणि तिचे वडील हयात असतील तर सदर अविवाहीत महिलेची मालमत्ता कायद्याने वडीलांकडे हस्तांतरीत होईल.
परंतू जर वडीलही मरण पावले असतील तर मरण पावलेल्या अविवाहीत महिलेची मालमत्ता तिची आई आणि भावंडांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.